Majha Gaon Majha Jilha : Maharashtra News : 22 July 2025 : माझं गाव माझा जिल्हा : ABP Majha

सोलापुरात पैशांचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी एका कथित फादरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाका' असा प्रचार सुरू होता. तसेच धर्मांतरासाठी दहा हजार रुपये देण्याचे आमिषही दिल्याचा आरोप आहे. बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी २५ जुलै रोजी कन्हेरवाडी भोपळा ग्रामस्थ परळी अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको करणार आहेत. या प्रकरणी एसआयटी आणि सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मस्तानदुपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑगस्टला होणार असून, सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकाटेंच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल मंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. नागपूरच्या डागा शासकीय रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त शंभर नवजात शिशूंना बेबी किटचे वाटप करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola