Jalna News | जालन्यात मुलाचा आजारी आईला पाठीवर घेऊन जीवघेणा प्रवास!
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतमी नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावातील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता होता, मात्र कालच्या पावसामुळे हा पर्यायी रस्ताही वाहून गेला. यामुळे एका मुलाला आपल्या आजारी आईला रुग्णालयात नेण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला. मुलाने आपल्या आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे सावरगाव येथील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. संपर्क तुटल्याने वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. "आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाचा आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ हा समोर आला." ही परिस्थिती गावातील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झाली आहे.