एक्स्प्लोर

Ajit Pawar : होय मी आहे कडक, मला वेड लागलं का? बारामतीकरांनी मला इतक्यांदा निवडून दिलं नसतं, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) होय मी कडक आहे, मला वेड लागलं का? जर मी कडक असतो तर बारामतीकरांनी मला इतक्या वेळी निवडून दिलं असतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना झापणं असो, पहाटेच्या वेळी पाहणी असो किंवा एखाद्या गोष्टीवरती त्यांची मिश्किल प्रतिक्रिया असो. अशातच अजित पवारांनी (Ajit Pawar) साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमावेळी केलेल्या स्फोटक भाषणाची सध्या चर्चा आहे. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) होय मी कडक आहे, मला वेड लागलं का? जर मी कडक असतो तर बारामतीकरांनी मला इतक्या वेळी निवडून दिलं असतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेत अजित पवार?

आता आम्ही लोक चांगलं काम करू पाहत आहोत. आम्ही पण सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे मला कुठेही आळस नाही. मला पण कामाची आवड आहे. मगाशी बाळासाहेब बोलले, अजित दादा (Ajit Pawar) कडक आहेत, आहे मी कडक, पण कोणाकरीता कडक आहे. मी चुकीचं वागणाऱ्याकरिता कडक आहे. जर तुम्ही योग्य वागलात तर मी पण तुम्हाला पाठिंबाच देईल ना. तुम्ही जर चुका केल्या नाहीत तर मला काय वेड लागलं आहे का? कडक वागायला. मी जर कडक वागलो असतो तर बारामतीकरांनी मला आठ वेळेला निवडून दिलं असतं काय? नावातच बारामती आहे. तिथंल प्रतिनिधीत्व करायचं आहे. ते काय येड्या गबाळ्याचं काम नाही, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.

तर तुम्ही योग्य पध्दतीने काम करा. तुम्ही लोकांना फसवू नका. लोकांची दिशाभूल करू नका.याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला असलं काही करू नका. या बोटाचा थुका त्याला त्या बोटाचा याला असलं काही करू नका. जे आपल्याला करता येईल तेच लोकांना सांगा. जे करता येत नाही त्याबद्दल लोकांना विश्वासात घ्या. याबद्दल ही ही अडचण आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण 7 लाख 20  कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना साडेतीन लाख कोटी मला राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर द्यावे लागतात. राहिलेल्या साडे तीन कोटींमध्ये आपण राज्याच्या सर्वांगिण विकासाकरता वापरतो. त्याचबरोबर रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील त्याच्यावरती प्रयत्न करत आहेत. याच पध्दतीने आम्ही 35 वर्षे समाजकारण आणि राजकारण करतो आहे. अकराव्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे भरपूर अनुभवांची शिदोरी सोबत आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
मी असेन किंवा नसेन, पण तू सर्वांची काळजी घे, भर पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंचा कंठ दाटला, नेमकं काय घडलं?   
मी असेन किंवा नसेन, पण तू सर्वांची काळजी घे, भर पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंचा कंठ दाटला, नेमकं काय घडलं?   
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Embed widget