एक्स्प्लोर

Fake Currency: मिरजमध्ये हवालदाराच्या चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या नोटा, कलर झेरॉक्स मशीनवर...., नेमकं प्रकरण काय?

Fake Currency: या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे.

मिरज (जि. सांगली): मिरज शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) जप्त केल्या असून, या प्रकरणात कोल्हापूर पोलिस दलातील एका हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा  (Fake Currency), कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. (Fake Currency) 

पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की या बनावट नोटांची  (Fake Currency) छपाई कोल्हापूर शहरातील पोलिस हवालदाराच्या चहाच्या दुकानात केली जात होती. हे दुकानच नोटा तयार करण्याचे अड्डे म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींकडून चौकशी सुरू असून, या बनावट नोटा कोठे कोठे फिरवल्या गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे. पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या. प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले आहे.

Fake Currency: आरोपींना पोलिस कोठडी

मुख्य सूत्रधार असलेले पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (४४, रा. कसबा बावडा), सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, टाकाळा), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने सर्वांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fake Currency: कलर झेरॉक्स मशीनवर बनावट नोटांची छपाई सुरू असल्याचे उघड

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ठिकाणी सापळा रचत छापा टाकला आणि सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, या बनावट नोटांची छपाई कलर झेरॉक्स मशीनवर करण्यात येत होती. या प्रकारात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या साखळीचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Fake Currency: चौकशीत हवालदार इब्रार आदम

इनामदार याच्या कसबा बावडा येथे असलेल्या सिद्धकला चहा या दुकानात कलर झेरॉक्स मशीनवर नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. इनार हा पोलिस दलात वाहनचालक म्हणून कार्यरत असून, कारवाईचा अहवाल कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आल्याचे घुगे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Embed widget