Sangli News : सांगली महापालिका आयुक्तसुनील पवार यांच्यावर एका व्यक्तीकडून बूट फेकून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या कैलास काळे नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. आयुक्तांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत सांगली महापालिकेसमोर निदर्शने केली.


रागाच्या भरात बूट फेकला 


लोकशाही दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या (Sangli Municipal Corporation) आयुक्त कार्यालयामध्ये विविध तक्रारी ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरु होता. आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत सुनावणी सुरु होती. यावेळी कैलास काळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्र बाबतीत असणारी तक्रार आयुक्त पावर यांच्यासमोर सादर केली. यावेळी कायदेशीरदृष्ट्या आयुक्तांनी सदरची तक्रार मान्य करण्यात येत नसल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यास सांगितले. यानंतर कैलास काळे यांनी रागाच्या भरात आयुक्त सुनील पवार यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर आपल्या पायातला बूट फेकून मारला.  


संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई, करावी अन्यथा काम बंद सुरुच राहिल


या घटनेनंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे याला ताब्यात घेत सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. काळे यांची तक्रार आणि मागणी आपल्या अखत्यारित येत नसल्याचे स्पष्ट केले होते, असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई, करावी अन्यथा काम बंद सुरुच राहील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन मागे घ्यावे आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन केले. 


इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या दारातच नणंद-भावजयीचा आत्मदहनाचा प्रयत्न 


दरम्यान तीन दिवसांपूर्वीच जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप करत दोन महिलांनी सांगलीमधील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या (Islampur) दारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. वाळवा तालुक्यातील कापूसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात तक्रार देण्यात गेल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून दोघी नणंद-भावजयीचा पोलिस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. 


इतर महत्वाच्या बातम्या