G20 summit : G-20 परिषदेसाठी पुण्यात आलेल्या विदेशी पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून सरस्वती वीणाच्या प्रतिकृती देण्यात येणार आहे. या वीणांची निर्मिती मिरजेतील तंतूवाद्य कारागिरांनी अवघ्या 10 दिवसांमध्ये (Saraswati Veena from miraj) पूर्ण केली आहे. पुण्यात G-20 परिषदेसाठी विदेशातील प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. या विदेशी पाहुण्यांना भारतीय संगीताची ओळख व्हावी, अभिजात संगीताचा वारसा ज्ञात व्हावा यासाठी काही भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या भेटवस्तूमध्ये सरस्वती वीणा देण्याचा निर्णय अंतिम क्षणी घेण्यात आला.


सरस्वती वीणा हे वाद्य दक्षिण भारतातील असल्याने याची निर्मितीही दक्षिणेतच होते. मात्र, अल्प वेळेत या भेटवस्तूंची उपलब्धता होणे गरजेचे होते. यामुळे मिरजेत अनेक तंतूवाद्य निर्मात्यांकडे 150 सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करुन देण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न करण्यात आले. अल्पवेळेत एकाच वेळी 150 सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करण्याचे आव्हान होते. हे आव्हान मिरज म्युझिकल इन्स्ट्रयूमेंट यलस्टरने उचलले आणि त्यासाठी लागणार्‍या धातूच्या चोचीचे डाय बनवण्यापासून ते वीणाचा साचा बनवण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सहकार्य केले. 


केवळ 10 दिवसात विदेशी पाहुण्यांसाठी 150 सरस्वती वीणाच्या प्रतिकृती


मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर आणि अल्ताफ पिरजादे या तंतूवाद्य कारागिरांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करत केवळ 10 दिवसात विदेशी पाहुण्यांसाठी 150 सरस्वती वीणाच्या प्रतिकृती तयार करुन पुण्याला पाठवल्या आहेत. या निमित्ताने तंतूवाद्य यलस्टर संकल्पना ही काय आहे हे दहा दिवसात दिसून आले. या निर्मितीमध्ये सीएनसी वर्ल्ड सांगलीचे वाजीम गोलंदाज आणि डायमेकर श्रीकृष्ण माने, शब्बीर तांबोळी,वीरेश संकाजे आणि काही महिला सहकार्‍यांची मदत झाली असल्याचे मिरजकर यांनी सांगितले.


सांगलीची महालक्ष्मी आटाचक्की चालली अमेरिकेला! 


आतापर्यंत सांगलीचा भडंग , द्राक्षे, बेदाणा, हळद, वीणा परदेशात निर्यात झालेले आपण ऐकलं असेल, पण आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. सांगलीत महालक्ष्मी आटाचक्की हा आटाचक्कीचा प्रसिद्ध ब्रँड असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आणि अर्धा एचपी पॉवरची महालक्ष्मी आटाचक्की डिझाईन करण्यात आली आहे. ती आता मुंबई आणि पुढे विमानामार्गे अमेरिकेत जाईल.


न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती. यासाठी त्यांनी शोध सुरु केल्यानंतर त्यांना मूळच्या कोल्हापूरमधील एका नातेवाईकाकडून महालक्ष्मी आटाचक्की बाबत कल्पना दिली. आपली आटाचक्की अमेरिकेला जाते याचा आनंद महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे सुभाष माने यांना इतका झाला, की त्यांनी अमेरिकेची खास ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला आटाचक्कीच्या दारावर स्थान दिले.


इतर महत्वाच्या बातम्या