सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) ऊस दर (Sugarcane Price) जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सांगतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर (vasantdada sakhar karkhana) धडकली आहे. कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवल. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला. याठिकाणी राजू शेट्टींच्या नेतृत्वात काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील असण्यात करण्यात आला आहे.


यंदा ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 100 रुपये द्या, या प्रमुख मागणीसाठी वसंतदादा कारखान्यावर (दत्त इंडिया) आंदोलन करण्यात आले कोल्हापुरात गेल्या वर्षाचे 100 रुपये आणि चालू वर्षाचे एफआरपी अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला ठरला होता. तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यावर राजू शेट्टी स्वत: उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदा ठिय्या आंदोलन केल्यानंतर सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी 8 डिसेंबरपर्यंत कारखानदारांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठकही नाही आणि तोडगाही निघाला नाही. त्यामुळे आज स्वाभिमानीकडून वसंतदादा कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.


दरम्यान,राजू शेट्टी यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तोडगा काढलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कारखानदारांना सामील आहेत किंवा कारखानदार त्यांचे ऐकत नाहीत, अशी शंका आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्यावर काटा बंद आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगतिले होते. 


जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही


दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील यांच्यावर शेट्टींनी केलेल्या टिकेनंतर जयंत पाटील  आणि राजू शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातात, जिल्ह्यातील सर्व कारखाने चालू आहेत, सर्व कारखान्याचे गाळप व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे माझ्यावर कोण काय बोललं यावर भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही या टीकेला राजू शेट्टी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटलांचे नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही. जयंत पाटलांनी आधी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, हे धंदे बंद करावेत असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या