जत (सांगली) : आतापर्यंत लाल- पांढरे आणि लालसर रंगाचे ड्रॅगन फ्रुट पाहत आलो आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात (Sangli News) जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं आहे. विशेष म्हणजे या पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटला लालसर रंगाच्या ड्रॅगन फ्रुट पेक्षा जास्त दर मिळतो आहे. त्यामुळे जतसारख्या दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा रुपयांनी दर अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या हंगामात आज अखेर सुमारे 8 ते 9 हजार टनांहून अधिक ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सांगली मार्केटमध्ये 230 ते 250 रुपयापर्यंत किलोला मागणी
राज्यात पहिल्यांदा व्हाईट ड्रॅगन फूड महाराष्ट्रात आणलं गेलं. व्हाईट ड्रॅगन फूड सुरुवातीला 12 वर्षांपूर्वी साधारणत: दीडशे दोनशे रुपये किलो प्रमाणे विकले जात होते. त्यानंतर रेड ड्रॅगन फूट आलं, त्यानंतर जम्बो ड्रॅगन फूड आलं. सध्या बाजारात 100 ते 150 रुपयांपर्यंत रेड ड्रॅगन फूड चालू आहे. 70 ते 80 रुपये व्हाईट ड्रॅगन फूड चालू आहे, पण येलो ड्रॅगन फ्रुट नवीन असल्याने आणि मालाची आवकही कमी असल्याने सांगली मार्केटमध्ये 230 ते 250 रुपयापर्यंत किलोला मागणी झाली आहे. मुंबई मार्केटला सुद्धा अडीशे तीनशे रुपयांपर्यंत मागणी आहे.आता ड्रॅगन फूड प्रोसेसिंग, ड्रॅगनपासून ज्यूस, जाम किंवा ड्रॅगन फ्रुटची पण निर्यातीची व्यवस्था शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड
ड्रॅगन फ्रुटचा चौथा बहार संपत आला असल्याने आता पाचवा बहार लवकरच सुरु होणार आहे. ड्रॅगन फुटच्या वाढत्या मागणीमुळे दरातही वाढ होत आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालू महिन्यात ड्रॅगन फ्रुटच्या दरात प्रति किलोस 50 ते 60 रुपयांची दर वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात गतवर्षी 10 हजार टन ड्रॅगन फ्रुटची विक्री झाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस 100 ते 160 रुपये असा दर मिळाला होता. दिवाळीपर्यंत ड्रॅगन फ्रुटचे दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले. कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढत आहे. यातच आता पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फूडचे देखील उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. यंदाच्या हंगाम राज्यात कमी पाऊस आणि ड्रॅगन फ्रुटला पोषक असे वातावण नसल्याने पहिला बहार लांबणीवर पडला. त्यामुळे बाजारात ड्रॅगन फ्रुट एक महिन्यांनी दाखल झाली. सुरुवातीच्या काळात आवक कमी अधिक होती. त्यामुळे सातत्याने दरात चढ उतार होत असल्याचे चित्र होते.
इतर महत्वाच्या बातम्या