Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज व कवठेमहांकाळ तालुक्याला वरदान मिळालेल्या दंडोबा डोंगरामध्ये  नर जातीचे सांबर रस्त्यावर फिरताना आढळून आले. या सांबराला कुत्र्यांपासून धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी त्याला सुरक्षितपणे मंदिरांजवळ उभे केले. त्यानंतर तत्काळ वन विभागाला कळवून आजारी असलेल्या सांबराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. सांबर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 


सांबराला रुग्णालयात उपचारासाठी वन विभागाचे अधिकारी घेऊन जाणार


दंडोबा परिसरामध्ये एमएसईबीसमोर असलेल्या मंदिरानजीक काही नागरिकांना नर जातीचे सांबर मिळून आले. हे सांबर आजारी अवस्थेत असून त्याला पोटाचा कदाचित आजार असावा त्यामुळे ते अशक्त झाले आहे. सांबराला व्यवस्थित चालता देखील येत नव्हते अशी माहिती वनविभागाचे अधिकारी युवराज पाटील व कोळेकर यांनी दिली. आजारी असलेल्या सांबराला रुग्णालयात उपचारासाठी वन विभागाचे अधिकारी घेऊन जाणार आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला दंडोबा परिसरातील वनामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली. नर जातीचे सांबर हे सात ते आठ वर्षांचे असल्यापासून दंडोबा परिसरामध्ये वावरत आहे. वारंवार ते शेतकऱ्यांना अथवा अधिकाऱ्यांना आम्हाला दिसून येते याची माहिती देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


दंडोबा परिसरामध्ये अनेक प्रजातीचे प्राणी आहेत, त्यातील सांबर हे एक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सांबर या परिसरामध्ये वावरत आहे. आज खरशिंग मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांनी व आसपास राहणाऱ्या नागरिकांनी सांबर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांबर उपचारासाठी पुढे नेले असून, योग्य उपचार झाल्यानंतर पुन्हा एकदा दंडोबा परिसरात त्याला सोडण्यात येणार आहे. 


लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा!


सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. मात्र, यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला. त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्हा पळून गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या