सांगली : राम मंदिर (Ram Mandir) उभा राहत असल्याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे. राम कोणत्याही पक्षाचा नाही, भाविकाचा राम आदर्श पुरुष आहे. महाराष्ट्रामध्ये रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा असून राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil on Ram Mandir) यांनी लगावला. जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीमधील (Sangli News) इस्लामपुरात श्रीराम मंदिरात कलश पूजन सोहळा पार पडला. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीराम मंदिरात जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कलश पुजनाचा सोहळा पार पडला.


राम मंदिरातील पूजा झाली की सगळे आपापल्या कामाला लागतील. त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल, असे वाटत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. आपणालाही राम मंदिर बघण्याची इच्छा आहे. गर्दी कमी झाल्यावर अयोध्याला आपण नक्क्की जाणार असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता 


जयंत पाटील म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापणा झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे, असा आरोप होत आहे. ते पुढे म्हणाले की, निमंत्रणावरून वाद झाला, पण कोणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे. सगळ्यानी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे. कुण्या एका पक्षाने देणगी दिली नाही. 


मी अयोध्याला दर्शनासाठी जाणार 


गर्दी असताना मी मंदिरात जात नाही, गर्दी कमी झाल्यावर मी अयोध्याला दर्शनासाठी जाणार आहे. महाराष्ट्राला सुखी करण्यासाठी प्रयत्न करत राहणार हा नवीन वर्षाचा संकल्प आहे. लोक आपल्याबदल सतत बोलत असतात, प्रत्येकाला उत्तर देत बसलो, तर कांम कधी करणार? मी मनाने कुठं आहे हे संजय शिरसाट कसे सांगत आहेत? माझं शिरसाट यांच्याशी कधी बोलणं पण नाही.


मराठा आरक्षणावर जयंत पाटील काय म्हणाले? 


लोकसभा आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकार मराठा आरक्षण देईल असे दिसते, ते कोर्टात टिकेल अथवा न टिकेल पण लोकसभा प्रचारात आरक्षणचा मुद्दा सरकारला।अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल असे दिसते. 


लोकसभा आचारसंहिता जाहीर होण्याआधी हे सर्व जाहीर होईल, पण सरकारने त्यात काही दोष राहू नये आणि कायद्यात टिकणारे असे आरक्षण सरकारने द्यावे. नाहीतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी झाल्या की कोर्टात परत आरक्षण टिकणार नाही असे व्हायला नको. आता मोठं मोठ्या घोषणा होतीलच, पण टिकणारे आरक्षण द्यावे. असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी जागा वाटपासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याशी भेट झाल्याचेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या