सांगली : द्राक्षांचे (Grapes) आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी सामुहिकपणे द्राक्ष बागांवर ( Wine Yard) कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पाऊस,ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणी आणून जगवलेल्या आणि हाता-तोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे.
अवकाळी पाऊस,ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे.दुष्काळी परस्थितीत टँकरने पाणी आणून जगावलेल्या आणि हाता-तोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे.द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी सामुहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
द्राक्ष काढणीला हजारो रुपय खर्च
जवळपास 15 ते 20 एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच घडकूज झाली आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात मणी फुटल्याने दलालांकडून दर देखील मिळत नाही,याशिवाय उरली-सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपय खर्च येत असल्याने अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवली जात आहे.
शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी
लोकरेवाडीतील जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांनी आपल्या 3 ते 4 एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर थेट कुऱ्हाड चालवलेली आहे,अशीच परिस्थिती संपूर्ण गावात देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करा, के सी पाडवी यांची मागणी
अवकाळीमुळे शेती आणि पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चारा पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जगवावीत कशी? असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांनी केलीय. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे. पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांनी केले आहे