Sangli News: सांगली जिल्ह्यातील (sangli Crime) पलूस तालुक्यातील नागठाणेमधील महादेव शिंदे यांच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 मेंढ्या ठार झाल्या, तसेच एक कुत्राही ठार झाला. ही घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. मेंढपाळ आपल्या मेंढ्यासह गेल्या चार दिवसांपासून वास्तवास आहेत. त्यांच्या समवेत कळपात जवळपास 450 मेंढ्या होत्या. अज्ञात प्राण्याने मध्यरात्री कळपावार हल्ला केला. या हल्ल्यात 26 मेंढ्यांच्या व एक राखणदार कुत्रा ठार झाला. अज्ञात प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. घटनेची कल्पना वनविभागाला देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस पाटील, सरपंच उपसरपंच व तलाठी यांनी भेट दिली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, रेडी ठार
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिराळा तालुक्यातील शिराळा खुर्द येथे नाईकदरा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी व एका रेडीचा मृत्यू झाला होता. वनविभागाकडून वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. शिराळा खुर्दमधील महिला शेतकरी सुवर्णा मोरे यांचे नाईकदरा परिसरात जनावरांचे शेड आहे. सोमवारी रात्री बिबट्याने हल्ला करत एक शेळी आणि रेडीला ठार केले. वनखात्याचे वनरक्षक प्रकाश पाटील, वन कर्मचारी अमर पाटील, कोतवाल बाबुराव काळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
कोल्हापुरातील हुपरीमध्येही शेळ्यांवर हल्ला
दरम्यान, मागील महिन्यात 7 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखान्यालगत पुनम परशुराम चिरमुले यांच्या बंदिस्त शेळीपालन शेडमधील 23 शेळ्यांचा हिंस्र प्राण्यांनी फडशा पाडला होता. यामध्ये 16 शेळ्या, दोन पालवी व पाच छोट्या पिलांचा समावेश होता. पु नम व परशुराम चिरमुले दांपत्याने शासकीय योजनेतून कर्ज काढून भाड्याच्या शेडमध्ये दोन वर्षांपूर्वी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला. शेडमध्ये 19 शेळ्या, तीन पालवी व पाच पिले अशी 27 प्राणी होते. यामधील केवळ 4 शेळ्या बचावल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या