सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha Election 2024) दाव्यावरुन इरेला पेटलेले काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil Sangli) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये (MVA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) गेली आहे. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र विशाल पाटील हे या मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे विश्वजीत कदम यांनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली. तरीही महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडली. त्या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. 


विश्वजीत पाटील नेमकं काय म्हणाले?


काँग्रेसचे नेते, आमदार  विश्वजित कदम,  विशाल पाटील यांसह जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील, महेंद्र लाड, जितेश कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. 


लोकसभा उमेदवारी बाबत जे झाले त्यावरून  कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांची कदर करत आम्ही ही प्रेस घेतोय. आमच्या भावना या प्रेसमध्ये मांडू. सांगली जिल्हामधील काँग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनेखातर ही पत्रकार परिषद घेत आहोत. 


जागावाटप चर्चा चालू झाल्यापासून आम्ही सर्वजण काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी यासाठी आग्रही होतो, वरिष्ठांकडे भावना पोहोचवल्या. सांगलीची जागा ही काँग्रेसला लढायला मिळावी, काँग्रेस त्याला सक्षम आहे या भावना आम्ही वरिष्ठांकडे पोहोचवल्या. 


गेल्या काही दिवसात मविआअंतर्गत ज्या बाबी झाल्या त्यामध्ये कोल्हापूरची जागा शाहू महाराज लढणार असे जाहीर झाले. मात्र सांगलीबाबत काही ठरलं नसताना उद्धव ठाकरे यांनी अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. 


उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सांगलीचा जो इतिहास आहे तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती, तर आज जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती. 


आजही आमची मविआमधील सर्व नेत्यांना विनंती की सांगलीची परिस्थिती पाहून उमेदवारी बाबत फेरविचार करावा. महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन ,पुन्हा फेरविचार करावा, ही महाविकास आघाडीला आमची विनंती आहे.   


कालची मविआमधील सांगलीची  जाहीर झालेली उमेदवारी आम्हला पचनी पडली नाही.


Vishwajeet Kadam and Vishal Patil Sangli press conference VIDEO : विश्वजीत कदम यांची पत्रकार परिषद



 


संबंधित बातम्या 


Sangli Loksabha : सांगलीत 2019 ला वंचितच्या पडळकरांनी खेळ केला आता इर्ष्या अन् कुरघोडीत कोण कोणाचा खेळ करणार?