Sangli: सांगलीत विटा एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचा पर्दाफाश सांगली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केला आहे. माऊली इंडस्ट्रीज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीवर एलसीबीने रात्री उशिरा छापा टाकत कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. (Sangli Crime) ही कारवाई सांगली पोलिसांसाठी मोठी कामगिरी मानली जात असून, या प्रकरणात कारखाना चालवणाऱ्यासह काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, केवळ केमिकल कंपनीचे नाव दाखवत या ठिकाणी अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू होता. (Drug Seized)


सांगली जिल्ह्यातील विट्याजवळील कार्वे एमआयडीसीत एमडी ड्रग्ज करणारी फॅक्टरी आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काल रात्री उशिरा माऊली इंडस्टीज या  केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार करणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला. या छापेमारीत तब्बल 14 किलों तयार एम डी ड्रग्स आढळून आल्याची माहिती आहे. छाप्यात एमडी ड्रग्जसह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. विट्यातील एक स्थानिक सराईत गुन्हेगार या ड्रग्ज प्रकरणात सामील असून ड्रग्ज प्रकरणी त्याचे  मुंबई कनेक्शन असल्याची चर्चा याठिकाणी सुरू आहे. रात्रभर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लवकरच सांगली पोलीस या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत


नक्की काय कारवाई झाली?


सांगली जिल्ह्यातील विटा एमआयडीसी परिसरात एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या एका गुप्त कारखान्यावर सांगली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली आहे. माऊली इंडस्ट्रीज नावाने केमिकल कंपनी असल्याचे भासवत या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. एलसीबीच्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकून कारखान्यातील साठा जप्त केला आणि कारखाना चालवणाऱ्या व्यक्तीसह काही जणांना ताब्यात घेतले आहे. एमडी ड्रग्ज, ज्याला 'एमडीMA' म्हणूनही ओळखले जाते. हे ड्रग अत्यंत हानिकारक नशेचा प्रकार असून त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. माऊली इंडस्ट्रीज नावाने केमिकल कंपनी सुरू केली होती, मात्र त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले जात होते.


केमिकल कंपनीच्या नावाखाली अवैध अंमली साठा!


प्राथमिक तपासानुसार, या केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. कारखान्याच्या मालकाने माऊली इंडस्ट्रीज या नावाखाली केमिकल उत्पादन चालवण्याचे भासवून हा अवैध व्यवसाय सुरू केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली एलसीबीने रात्री कारखान्यावर छापा टाकला. यावेळी त्यांना कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ साठा सापडला आहे. सध्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या छाप्यादरम्यान एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनांचे साठे आणि उत्पादन प्रक्रियेचे उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास एलसीबी करत आहे. सांगली पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. अमली पदार्थांचा व्यवसाय रोखण्यासाठी ही मोहीम महत्वाचे पाऊल मानली जात आहे. या घटनेने विटा आणि परिसरात मोठी खळबळ माजली आहे.


हेही वाचा


मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके


आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर