Sangli Krishna River News:  सांगली (Sangli) जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 36 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरती पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. 


शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


सांगली जोरदार पाऊस कोसळतोय. यामुळं कृष्णा पाणी पातळी 36 फुटावर गेली आहे.  कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरवाडी गावचा संपर्क तुटला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीकाठच्या सर्वच गावातील दुकानदारांनी रात्रीच दुकानातील साहित्य इतरत्र हलवले आहे. आज सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा या चार तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरवाडी गावचा संपर्क तुटला आहे. या गावातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. दरम्यान नदीचे पाणी दुकानात शिरणाऱ्या कृष्णा नदी काठच्या सर्वच गावातील दुकानदारांनी देखील रात्रीच दुकानातील  साहित्य इतरत्र हलवायला सुरुवात केली आहे.


कोयना धरणातून 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग 


कोयना आणि चांदोली धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कृष्णा नद्यांना सध्या पूर आला आहे. कोयना धरणातून 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  त्यामुळं कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.


आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडरत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सावधान! अतिमुसळधार पावसाचा इशारा, वाचा आजचा हवामान विभागाचा अंदाज