Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडीतील शेतकरी वेताळ चव्हाण यांनी महावितरणचे (Mahavitaran) भरारी पथक शेतात आल्यानंतर थेट इंग्रजी भाषेत सुनावल्याचा व्हिडिओ (Sangli Farmer Conversation with Mahavitaran engineer video) सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. शेतकरी वेताळ चव्हाण यांनी कनेक्शन मिळत नसल्याने आपली व्यथा भरारी पथकातील कर्मचाऱ्याकडे इंग्रजीतून मांडली. वीज चोरी पकडण्यासाठी आल्यानंतरचा दोघांमध्ये संवाद झाला. यावेळी ते आपली व्यथा सांगताना दिसून येत आहेत.
आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून शेती पंपासाठी होणारी वीजचोरी पकडण्यासाठी आटपाडी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनील पवार हे पथकासोबत आटपाडी तालुक्यात य.पा वाडी गावी मंगळवारी दुपारी गेले होते. यावेळी य.पा.वाडी गावचे वेताळ चव्हाण शेतामध्येच होते.
पाहा व्हिडीओ :
त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी वेताळ चव्हाण यांनी सहाय्यक अभियंता सुनील पवार याच्याशी इंग्रजीमधून संवाद साधत (sangli farmer english speaking video) आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकारी सुनील पवार यांनीही वयस्कर शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजीमधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची बाजू ऐकून घेत वस्तुस्थिती समजून सांगितली. दोघांमध्ये संवाद होत असताना इंग्रजीमध्ये झालेले संभाषण पथकातील कर्मचाऱ्यांनी रेकाॅर्ड केल्यानंतर सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या