सांगली: आरक्षण (Maratha Reservation) म्हणजे परड्यातली भाजी आहे का? कुणीही उठावे आणि आरक्षण मागावे, असं म्हणत महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाने राजकारण केलं जातंय असा आरोप विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला. राज्यात आरक्षणाचे राजकारण केले जात आहे, जनतेने हे डाव आता ओळखले पाहिजेत असंही ते म्हणाले. 


महाविकास आघाडीवर टीका करताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान झाले आणि असे सांगितले गेले की मराठा आरक्षणाला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे. मग आता महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले आहेत त्यांनी लिहून द्यावे की ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यासाठी आमचा पाठींबा आहे. अगदी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही तसे लिहून द्यावे. यांना कोणालाही  हा प्रश्न सुटू द्यायचा नाही. चिघळू द्यायचा आहे.  


10 टक्के आरक्षण टिकवूया


लोकसभेला आपलं जमलंय, आता त्यावर स्वार होऊन  विधानसभेला जिंकता येतंय का हेच काम महाविकास आघाडीचं चालू आहे असा थेट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. मी मराठा समाजाला विनंती करतो की आपण मिळालेले 10 टक्के आरक्षण टिकवूया असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.


नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम शरद पवारांनीच केल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. 


ही बातमी वाचा: