सांगली: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सांगलीच्या जतमधील (Sangli Jat) एकाने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत शहरातील दत्त कॉलनीतील एका व्यक्तीने ही आत्महत्या केली आहे. 


पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहून, स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि सासूसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पतीने दुसऱ्या विवाहाचे फोटो स्टेटसला ठेवले, पहिल्या पत्नीची आत्महत्या


शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, 25 ववर्षीय डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर प्रकरण न्यायालयात सुरू होते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पतीने दुसरे लग्न करून, दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटस ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. डॉ. आयशा शेख (वय 25 वर्षे) असे मयत तरुणीचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या तरुणीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच पुढे पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले. वाद आणखीच वाढल्याने आयशा ही पतीचे घर सोडून माहेरी येऊन राहू लागली. वाद आणखीनच टोकाला गेल्याने प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले. दरम्यान, न्यायालयात वाद सुरु असतानाच डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे, दुसऱ्या पत्नीसोबतच्या लग्नाचे छायाचित्र त्याने स्टेटसवर ठेवले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावात होती. 


अमरावतीत दोघांची हत्या करत केली आत्महत्या 


एक्स गर्लफ्रेण्डची आई आणि भावाला जिवंत जाळून तरुणाने स्वत:ही पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. वरुड तालुक्यातील वंजडी इथे रविवारी रात्री हा प्रकार घडला. लता सुरेशराव भोंडे आणि प्रणय सुरेशराव भोंडे अशी जाळून हत्या केलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर आशिष ठाकरे असं मृत आरोपीचं नाव आहे.


ही बातमी वाचा :