एक्स्प्लोर

Sangli : फुल दिले की फुलच मिळते, दगड दिला की दगडच मिळतो, कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही : जॅकी श्रॉफ

Jackie Shroff : पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत असा संदेश अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी दिला.

सांगली : आपण कुणाला फुल दिलं तर आपल्यालाही फुलच मिळतं, तर दगड दिला तर दगड मिळतात. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी शांत राहायचं. कोणाचे पाय कापून आपण उंच होणार नाही असं वक्तव्य अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी केलं. आटपाडीच्या गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला.

खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक केलं. जॅकी श्रॉफ यांनी ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. 

कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात फरक असतो. सुहास बाबर हे बोलण्याइतकेच कृतीतही प्रामाणिक आहेत. जॅकी श्रॉफ यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.

आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी ही कोणत्याही पक्षाची नव्हे तर समाजाची चळवळ असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला असून पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जॅकी श्रॉफ यांच्या सहभागामुळे या मोहिमेला राष्ट्रीय ओळख मिळणार असून विट्यातून सुरू झालेली ट्री आर्मी आता देशभर आणि जगभर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार बाबर म्हणाले, मला मी खूप जमिनीवर राहून काम करतो असे वाटायचे. परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटला आहे. एक सेलिब्रिटी असून देखील किती विनम्र आणि किती साधे असावे हे पाहून आवाक झालो आहे.

जॅकी श्रॉफ यांचे खानापुरात औक्षण करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा साधा नाष्टा त्यांनी केला. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचे गौरवोद्गार आमदार बाबर यांनी काढले. 

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

Embed widget