Sangli News : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली साखर कारखान्याच्या (mahankali sugar factory) परिसरात भीषण आग लागली आहे. आज (4 मार्च) सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे कारखाना परिसरातील गवताने घेतला पेट घेतला. कारखान्याच्या गोडाऊनच्या चारी बाजूंनी भीषण आगीने रूप धारण केलं आहे. त्यामुळे आग आणखी वाढल्यास कारखान्याच्या मशीनरीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या