Sangli News : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सांगली, सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो. या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेसह धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूरच्या कृष्णेच्या तीरावर हे बेट वसलं आहे. रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी आख्यायिका सांगितल्या जातात. एका कथेचा उल्लेख सापडतो. 


एक आख्यायिका अशी आहे


प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्रीराम, लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले, पण हनुमान कुठे दिसेनात. तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले की, इथं मारुती का नाही? तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की, यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे. तेव्हा समर्थांनी हाक दिली, याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे.


त्यानंतर समर्थांनी गावकऱ्यांना 11 खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले आणि डोहात उडी मारून मारुतीची 11 गज उंचीची सुवर्णमूर्तीवर काढली. मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी 11 खंडीचा नैवेद्य तयार केला न्हवता. मारुती ताटकळणार कसे? म्हणून ते गुप्त झाले. पुढे मारुतीचे दैवी रूप आठवून समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि बहे इथे रामलिंग बेटावर तिची स्थापना केली. इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे. बेटावर चिंच, वड, पिंपळ, जाभूळ आणि इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलींनी परिसर सुशोभित आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Sangli News : जत तालुका, पाचवीला पुजलेला दुष्काळ... परिस्थितीवर मात करत करजगीच्या पोरानं 'IBPS' परीक्षेत केलं टॉप