Sangli News: शासनाने द्राक्ष बागायतदारांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांना दर नाही म्हणून बेदाणा केला, पण बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे त्यालाही दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. द्राक्ष व बेदाणा उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख तसेच बेदाणा उत्पादकाना प्रति टन एक लाख अनुदान द्या, यासह अन्य मागण्यांसाठी 17 मे रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.


राज्यात सांगली जिल्हा हा द्राक्ष व बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून म्हणून ओळखला जातो. यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. चार किलोची पेटी 70 ते 100 रुपयांना विकली. द्राक्षाला यंदा फारच कमी दर मिळाला आहे.  चिरमुरे 140 रुपये किलो आणि द्राक्षे 25 ते 30 रुपये किलो विकले जातात हे वास्तव आहे. द्राक्षाला दर नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला, पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे. दरवर्षी 18 ते 20 हजार गाडी बेदाणा उत्पादन होते, पण चालूवर्षी ते 30 हजार गाडी पर्यंत गेले आहे. 


एक गाडी म्हणजे 10 टन सुमारे तीन लाख टन उत्पादन झाले आहे. त्यामुळे मिरज आणि तासगाव तालुक्यातील सर्व कोल्ड स्टोरेज फुल्ल झाली आहेत. बेदाणा ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बेदाणे दर पडले आहेत. त्यामुळेच या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांस अनुदान देण्यात आले, त्याच धर्तीवर द्राक्ष व बेदाना उत्पादक शेतकर्यांना एक लाखाचे अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक ग्रामीण भागात रोजगार पुरवितात, औषध विक्रेत्यांना मोठा व्यवसाय देतात, वाहन धारकांना ही व्यवसायाची संधि देतात अर्थातच द्राक्ष व बेदाणा निर्मिती हे सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा मुख्य स्त्रोत आहे. 


काय आहेत प्रमुख मागण्या?



  • द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला अकरी एक लाख अनुदान द्या 

  • बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला प्रती टन एक लाख अनुदान द्या 

  • द्राक्ष आणि बेदाना खप कमी झाल्याने  ही समस्या उद्भभवत आहे. त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा खाणे कसे हितकारक आहे याची ब्रँड हिरो घेवून पणन महामंडळाने टी वी वर जाहिरात सुरु करावी 

  • गंडा टाळण्यासाठी दलालांना परवाना सक्तीचा करावा तसेच गंडा घालणाऱ्या ना अटक करण्यासाठी राज्यव्यापी पोलिस पथक तयार करावे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करावा. 

  • बेदाणा उधळण 100 टक्के बंद करावी 

  • बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत 

  • बेदाणा पेमेंट 21 दिवसात द्यावे त्यानंतर दिल्यास 2 टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे 

  • कीटकनाशकाच्या किमती कमी कराव्यात, त्यावरील जीएसटी कमी करावा 

  • शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा 

  • बेदाणा पणन नियमनात आणावा


इतर महत्वाच्या बातम्या