Sangli News: नर्तकी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नाच गाण्याच्या कार्यक्रमाला बोलवून लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला "चार चाँद" लावण्याचा पराक्रम सांगलीमधील तासगाव तालुक्यातील वायफळेतील एका बहाद्दराने केला आहे. गौतमी पाटीलचा नाच गाण्याचा कार्यक्रम आणि वाद असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, एका संघटनेकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा मिळूनही कार्यक्रम शांततेत पार पडला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप त्या संघटनेने केला होता. गौतमीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा युपी, बिहार होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. 


वायफळेमधील विठ्ठल घोडके यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाने अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गौतमी पाटील ही राजकारण, समाजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. तिच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून यापूर्वी सांगली जिल्ह्यात गौतमीचा कार्यक्रम होऊ देणार नाही, ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील तेथील कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. 


गाणं आहे गौतमीचं आणि होऊ दे खर्च


गौतमी पाटील (Gautami Patil) हे नुसतं नाव ऐकलं तरी, अनेकाच्या तोंडी एकच वाक्य येतं ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. मात्र, गौतमीच्या कातिल अदा पाहण्यासाठी खिशालाही खड्डा पडू लागला आहे. गौतमीच्या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांमध्ये  धुडगूस अनेकदा झाल्याने आता गौतमीच्या दिमतीला बाऊन्सरही असतात.


मात्र, गौतमीसाठी एका पठ्ठ्यानं असा काही खर्च केला आहे की होऊ दे खर्च असे म्हणायची वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवशी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या सेलिब्रेशनला नेहमीप्रमाणे वादाचं गालबोट नको म्हणून आयोजकांनी पैसे देऊन अतिरिक्त पोलिस सुरक्षा तैनात केली होती. त्यामुळे यासाठी आयोजकांनी अतिरिक्त सव्वा पाच लाख रुपये मोजावे लागले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी पेड बंदोबस्त बंधनकारक नाही, पण वाद नको म्हणून आयोजकांनी पाण्यासारखा पैसा ओतला. त्यामुळे, गाणं आहे गौतमीचं आणि होऊ दे खर्च अशी चर्चा आता रंगली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या