kini Toll Plaza MNS aandolan : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याची 2 मे रोजी मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून आंदोलन करण्यात आले. अभिनव पध्दतीने आंदोलन करत काही काळ टोल नाका बंद करण्यात आला. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर उभे राहून गाड्या सोडल्या.
किणी आणि तासवडे टोलनाका राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या टोलनाक्यावरून पुन्हा वसूली करण्यात आली आहे. महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले नसतानाही टोलवसूली होत असल्याने मनसेकडून आंदोलन करण्यात आले. मनसेकडून टोल वसूली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay pawar on Sanjay Mandlik : उमेदवारीसाठी 10 फोन करत होता, आता प्रशासकीय यंत्रणा घेऊन निवडणूक लढा, संजय पवारांचा संजय मंडलिकांवर बोचरा वार
- CPR Hospital Kolhapur : सीपीआरमधील शवविच्छेदन विभागातील फ्रिजर 6 दिवसांपासून बंद, मृतदेह सडल्याने संतापाची लाट
- Dhairyasheel Mane : उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं, पुत्रवत प्रेम दिलं, विजयासाठी रान केलं, मग धैर्यशील माने सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?
- Kolhapur News : हुपरी पोलिस ठाण्यातील विशाल चौगुले यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू