CPR Hospital Kolhapur : सीपीआर प्रशासनाने हलगर्जीपणाचा कळस करताना गेल्या आठवडाभरापासून शवविच्छेदन विभागागतील फ्रिजर बंद असूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनामुळे मृतदेह सडल्याने सामाजिक कार्यकर्त्यांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. दुर्दैवाचा फेरा म्हणजे शवविच्छेदन विभागातील फ्रिजर  बंद असूनही कोणतीच कारवाई सीपीआर प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही अवहेलना सुरुच असल्याचा प्रकार सीपीआरमध्ये घडला आहे.  


सीपीआर फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधारवड नसून तळकोकणातून रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे मृत्यूनंतरही सुटका नाहीच असा एकंदरीत प्रकार सीपीआरमधील प्रशासनाच्या गलथान कारभारावरून समोर आला आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने संतापाची लाट उसळली आहे.


सीपीआरमध्ये सांगली तसेच कर्नाटकमधील सुद्धा रुग्ण सीपीआरमध्ये येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर  सीपीआरमध्ये रुग्ण रुग्णांची ये-जा सुरू असते. फ्रिजर बंद असल्याने मृतदेह सडून दुर्गंधी पसरल्याने त्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. 


फ्रिजर बंद असल्याने विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात येऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीय. अनेकवेळा शवविच्छेदनासाठी येणाऱ्या नातेवाईकांमुळे विलंब लागतो. अशावेळी मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवले जातात. त्याचबरोबर बेवारस मृतदेहाची ओळख पटेपर्यंत तसेच पोलिसांकडून कारवाई होईपर्यंत ते फ्रिजरमध्ये ठेवले जातात. 


इतर महत्वाच्या बातम्या