Kolhapur News :  हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विशाल वसंतराव चौगुले (वय 37) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कार्यालयामध्ये कर्तव्यावर असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सहकाऱ्यासह इचलकरंजी येथील रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली. एका उमद्या सहकाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. विशाल चौगुले हातकणंगले तालुक्यात वास्तव्यास होते. ते हुपरी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. पोलिस स्टेशनमध्ये क्लार्क म्हणून जबाबदारी पार पाडत होते. 
 


इतर महत्त्वाच्या बातम्या