Sangli ED Raids : सांगली (Sangli) शहरात आज (23 जून) सकाळी ईडीचे (ED Raids) दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगरमधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात चौकशी करत आहेत. तिथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या कोणताही तपशील माध्यमांना देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. ईडीच्या दोन पथकातील अधिकाऱ्या पारेख बंधूंच्या जनशांती आणि विश्वास या दोन बंगल्यात आज सकाळी छापा टाकला.


पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकल्सचा मोठा व्यवसाय


पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. सांगली शहरातील गणपती पेठ भागात त्यांची इलेक्ट्रिकल्सची दुकान आहेत. त्यांचे शिवाजीनगर परिसरात बंगले आहेत. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चौकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 


बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी


आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरुन ही चौकशी  सुरु असल्याचे समजतं. पारेख बंधूंच्या बंगल्यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या चौकशीबद्दल स्थानिक पोलिसांनी सुद्धा येऊन चौकशी करुन माहिती घेतली आहे. पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये चौकशी करण्याबरोबरच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काही बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र नकार दिला आहे. सांगलीतील पारेख बंधुंच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे याच व्यावसायिकांवर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेतून सीमा शुल्क आणि व्हॅटच्या पथकांनी छापे टाकले होते. तर जीएसटी विभागाने कर वसूल केला असल्याची माहिती आहे. सांगलीतील या व्यावसायिकांवर चौथ्यांदा केंद्रीय पथकांचे छापे पडल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 


ईडीची राज्यभरात कार्यवाही


दरम्यान राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या कारवाई सुरु आहे. महाराष्ट्रभरात विविध शहरांमध्य छापे टाकले जात आहेत. त्यात आज सांगली शहरातील दोन उद्योजकांच्या घरावर ईडीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. पहाटेच्या सुमारास उद्योजकांच्या घरावर पडलेल्या या धाडीने शहरात मोठी खळबळ उडाली.


VIDEO : Parekh Brothers Raid : पारेख बंधूच्या दोन बंगल्यांवर छापेमारी, सांगलीत ईडीची छापेमारी



हेही वाचा


COVID Center Scam ; कोविड घोटाळा, बीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, कोण कोण अडचणीत?