COVID Center Scam ; कोविड घोटाळा, बीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, कोण कोण अडचणीत?

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात आज सलग दुसऱ्या दिवशीही ईडी अधिकाऱ्यांकडून मुंबईत छापेमारी झाली. बीएमसीचे उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड यांच्या घरांसह मुंबई महापालिका कार्यालयावरही ईडी अधिकार्‍यांकडून छापेमारी करण्यात आली. मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याही घरी ईडी अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. मुंबई महापालिकेने हे कंत्राट दिलेली पद्धत पाहता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळंच कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि कंत्राट प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram