Sangli News : देश कुठं चालला आहे याचं भान ठेवा आणि भाजपमध्ये या असे म्हणत सांगली जिल्ह्यातील भाजप खासदार संजय पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. सांगलीत सिव्हील चौकात स्वर्गीय डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम चौक नामकरण व सुशोभीकरण सोहळा कार्यक्रम पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात खासदार संजय पाटील बोलत होते.
खासदार संजय पाटील यांनी भाजप प्रवेशाची ऑफर दिली. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कै. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील उपस्थित होत्या. यावेळी खासदार संजय पाटील यांनी विश्वजित कदम यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली.
विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत हे विद्यमान आमदार आहेत. त्याच्याकडे पद आहे. त्यामुळे विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांना पक्ष बदलण्याची जास्त गरज आहे, असे म्हणत खासदार संजय पाटील यांनी या काँग्रेस नेत्यांना भाजप प्रवेशासाठी खुली ऑफर दिली.
इतर महत्वाच्या बातम्या