Chandrakant Patil on Jayant Patil: सांगलीत निघालेल्या 'महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला' (Maharashtra Sanskriti Bachav Morcha BJP reply) भाजप इशारा सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. या सभेत प्रचंड मोठा रावण जाळणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर आता 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपची सभा होणार असून त्या सभेत मी सविस्तर बोलणार असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.
सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे
सांगली (BJP vs NCP Sangli politics) भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Rajarambapu Patil remarks) देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अरे गोपीचंद राजारामबापू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही, त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असा सल्ला दिला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची सुद्धा आठवण करून दिली. ऑनलाइन लॉटरी घोटाळ्याची (Online lottery scam) पुन्हा चौकशी करावी लागेल, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Sangli District Bank scam inquiry) चौकशी लागलीच पाहिजे, नोकरभरती चौकशी झालीच पाहिजे, सर्वोदय कारखाना कुणी लाटला? आता सोडणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil warning to NCP) यांनी दिला. सांगलीच्या सभेत आम्ही प्रचंड मोठा रावण दहन करणार आहोत, असेही ते म्हणाले.
फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय?
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून फडणवीसांनी (Devendra Fadnavis criticism NCP leaders) तुमचं काय घोडं मारलंय? अशी विचारणा केली. त्यांनी आरक्षण दिलं ही चूक झाली का? अशीही विचारणा त्यांनी केली. पेशवाई, एकादशीला मटण वक्तव्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राजाराम बापू पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना आम्ही समज देऊ, पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि कुटुंबावर खालच्या शब्दात टीका का केली गेली? असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, पडळकर यांनी जे वाक्य म्हटलं त्याला आमचं नेतृत्व खंबीर आहे, पण मिटकरीचे कान कुणी पकडले का? गोपीचंद पडळकर याना समज देऊ, तुम्ही घाबरता म्हणून एकत्र येऊन टीका करता. भाजप कार्यकर्त्यांनी कुणी अंगावर याल तर शिंगावर घ्या, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, राज्यात जातीयवाद कुणी निर्माण केली? संभाजीराजे यांना मोदींनी खासदार केलं. वाटेल ते बोललं, तर सहन करणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या