Sangli: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही हळदी कुंकू लावून बाहुल्या पडलेल्या दिसल्या की करणी भानामती जादूटोण्याचे प्रकार असल्याचे समज होताना दिसतात. असाच एक प्रकार सांगलीतील इस्लामपुरात घडलाय. इस्लामपुरातील महिलेने दार उघडताच उंबरठ्यावर बकऱ्याचे मुंडकं रंगीत दोरीन लटकवल्याच दिसलं. दार उघडताच सुया टोचलेले 21 लिंबू दिसल्याने जादूटोणा आणि करणीचा प्रकार असल्याचे  सांगत लोक भयभीत झाल्याची घटना घडलीय. (Black Magic Fear)

Continues below advertisement


ज्या महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचं कळलं त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी घराबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेचं हस्तक्षेप करून कुटुंबीयांचे आणि लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला केले. व लोकांमधील घबराट दूर केली. इस्लामपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर हा प्रकार कोणी केला व अंधश्रद्धेचा प्रसार व प्रचार करणाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे. 


नक्की घडले काय?


इस्लामपूर येथील ऊरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून  कुटुंबीयांचे, लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्यात तयार झालेली घबराहाट दूर केली.


नारळाला तीन काळ्या बाहूल्या, टोचलेले लिंबू..


या बाबत अधिक माहिती अशी की, उरूण भागात एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या दरम्यान दारातच जादूटोणा , करणीचे साहित्य आढळले. त्यांच्या बकऱ्याचे मुंडके चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते त्यावर लिंबू सुया पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले  त्यावरही पिना टोचलेले समोर ठेवलेले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेले फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी कुंकू गुलाल   टाकलेला होता. परिसरात सर्व सामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरलेले होते,हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. 


अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला.काही वेळातच घटनास्थळी पोलीस आले.संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले,त्यांचे प्रबोधन केले.अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही.आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत त्यामुळे अशा अघोरी ,अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे.करणी ,जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्या वर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील.सर्व साहित्य संजय बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर घटनेची तक्रार घरातील महिलेनी पोलिसांच्याकडे केली आहे.


हेही वाचा:


Pune Porsche Case : पुणे हादरवून टाकणाऱ्या पोर्श हिट अँड रन प्रकरणात 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार?