Jayant Patil : एकनाथ शिंदे यांनी  बंडाळी करून महाविकास आघाडी सरकारला हादरा दिला. त्यामुळे सरकार कोसळल्याने तिन्ही पक्षातील नेते विरोधी बाकांवर आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांतील नेत्यांकडून गणेश मंडळांच्या भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे दर्शन डिप्लोमसी चांगलीच रंगली आहे. 


याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर शहरात गणरायाचे दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांची एका चिमुकलीची जयंत यांच्याशी भेट झाली. यावेळी या चिमुकलीने तिच्या नवीन टी शर्ट सोबत फोटो घेण्याचा हट्ट जयंत पाटील यांच्याकडे धरला. 


त्यामुळे जयंत पाटील यांनी देखील चिमुकलीचा हट्ट पुरवत तिला हवा तसा फोटो काढून देऊन तिचा हट्ट पुरवला. मात्र त्या मुलीच्या शर्टवरील अपना टाईम आयेगा हे वाक्य कुणासाठी दर्शवले जात आहे याची हळूच चर्चा त्या ठिकाणी रंगली. त्यामुळे शांतीत क्रांती करत करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील यांच्या मनामध्येही 'अपना टाईम आयेगा' विचार आला असेल यात शंका नाही.