Sangli Crime News : शेतकऱ्यांकडून द्राक्षं खरेदी करून त्यांची परस्पर विक्री करुन पळून जाणाऱ्यां भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याशिवाय या भामट्याकडून पोलिसांनी थोडी थोडकी नाही, तर तब्बल 47 लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ज्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे आणि मुंबईमधून या प्रकरणातील आरोपींना ताब्यांत घेण्यात आलं आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांची सांगलीतील विटा पोलिसांनी भांडाफोड केली. त्यांच्याकडून तब्बल 47 लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये सहभागी असणाऱ्या दोन आरोपींना पुणे आणि मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सांगलीतील विटा पोलिसांनी (Vita Central Police Station) दिलेल्या माहितीनुसार, "पुणे, औंध येथील द्राक्ष एक्सपर्ट कंपनीचे चालक आणि मालक असल्याचं भासवत खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आजवर या भामट्यांनी गंडा घातला आहे. या प्रकरणा संदर्भात चिखलहोळ येथील धनाजी शामराव यमगर यांनी विटा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यमगर यांच्यासह इतर 14 शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सुधाकर बारसकर आणि प्रवीण नारायण फटांगरे यांनी शेतकऱ्यांकडून द्राक्षं खरेदी केली होती. त्यानंतर या भामट्यांनी खेरदी केलेली द्राक्ष परस्पर विकून त्यांचे पैसे शेतकऱ्यांना न देताच त्यांनी पलायन केलं होतं. याचा विटा पोलिसांनी कसोशीनं तपास करुन दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल 47 लाख 5 हजार 850 इतकी रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jalna : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम
- फसवणुकीचे 77 हून अधिक गुन्हे, गुन्हेगाराच्या कस्टडीसंबंधी गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी तयार केला WhatsApp ग्रुप
- बेकायदेशीर लॉटरी आणि सट्टेबाजांवर मुंबई पोलिसांची छापेमारी, रोख रक्कम आणि साहित्यासह 10 जणांना अटक