बुलढाणा : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर  (Samruddhi Mahamarg) प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून कुठल्याही क्षणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे.  तब्बल 65 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर - मुंबई असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वप्नातला हा महामार्ग आता येत्या काही दिवसात पूर्णत्वास ही जात आहे. मात्र त्यापूर्वीच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील रेती माफीयांची वक्र नजर या महामार्गावर पडली आहे. आणि  "एक्सेस कंट्रोल" म्हणून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेती माफीयांनी चक्क या महामार्गावर अनधिकृत "एक्सेस" मिळवला आहे. 

Continues below advertisement


चक्क समृद्धी महामार्गाचे साईड बॅरिअर तोडून अवैधरित्या प्रवेश 


खरंतर या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी कुठल्याही वाहनाला अधिकृत टोलनाक्यावरूनच प्रवेश मिळतो , मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते सिंदखेड राजा दरम्यान तळेगाव पुलाजवळ चेनेज 322 वर रेती माफीयांनी चक्क समृद्धी महामार्गाचे साईड बॅरिअर तोडून अवैधपणे समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळवला आहे. यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या वाहनाला अचानक रेतीचे टिप्पर दिसलं की चालक गोंधळतो आणि यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


मोठा अपघात होण्याची शक्यता


आधीच समृद्धी महामार्ग अपघातामुळे प्रसिद्ध झाला आहे. शेकडोंची जीव आतापर्यंत समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे गेले आहेत. मात्र चक्क समृद्धी महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेती माफिया ठिकाणावरून समृद्धी महामार्गावर आपली वाहने आणतात आणि जालना संभाजीनगर येथे रेती तस्करी करतात. मात्र अद्यापही बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे या बाबीकडे लक्ष जात नाही. चेनेज 322 वर रेती माफीयांनी नदीतून सरळ समृद्धी महामार्गावर येण्यासाठी साईड बॅरियर तोडून समृद्धी महामार्गावर आपली वाहने आणत आहेत. यामुळे मात्र समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुका आणि मेहकर जवळ अशा दोन ठिकाणी अवैध रेती तस्करांनी अशा प्रकारे समृद्धी महामार्गाचे साईड बॅरिअर तोडून नवीन मार्ग तयार करून थेट समृद्धी महामार्गावर रेतीमाफी यांची वाहने सुसाट धावत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या