Raid 2 Box Office Collection Day 11: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat Movie) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'केसरी 2' (Kesari 2) आधीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांसोबत 'हिट 3' आणि 'रेट्रो' हे दोन मोठे तमिळ चित्रपट देखील प्रदर्शित झाले. एवढंच नाही तर हॉलिवूडचा मोठा चित्रपट थंडरबोल्ट्स देखील 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. इतकी स्पर्धा असूनही, 'रेड 2'नं बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडलेली नाही आणि त्याच्या कलेक्शनमध्ये सतत वाढ होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर चित्रपटाची कमाई आणखी वाढली. आज चित्रपट प्रदर्शित होऊन 11 दिवस झालेत. तर आजपर्यंत म्हणजेच, दुसऱ्या वीकेंडच्या शेवटच्या दिवशी चित्रपटानं किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' चित्रपटाच्या कमाईशी संबंधित अधिकृत आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार, नवव्या दिवशी 5.33 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, दहाव्या दिवशी चित्रपटानं 8.52 कोटी रुपये कमावले आणि चित्रपटाचं एकूण कलेक्शन 112.42 कोटी रुपये झालं आहे.
चित्रपटाच्या कमाईशी संबंधित अकराव्या दिवसाचे आकडे Sakcinlk वर आले आहेत आणि आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत चित्रपटानं 124.17 कोटी रुपये कमवले आहेत, 11.75 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
'रेड 2' 2025 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल?
या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीवर नजर टाकल्यास, 'छावा'नं 600 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. 'स्काय फोर्स' 131.44 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता 'रेड 2'नं यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, त्यानं सलमान खानच्या 'सिकंदर'ला मागे टाकलं आहे, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 103.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाचं कलेक्शन ज्या पद्धतीनं वाढत आहे ते पाहता, हा चित्रपट लवकरच स्काय फोर्सला मागे टाकून दुसरं स्थान पटकवेल अशी आशाही वाढत आहे. यासाठी रेड 2 ला अजून सुमारे 7 कोटी रुपयांची कमाई करणं आवश्यक आहे.
'रेड 2'चं बजेट, स्टारकास्ट आणि वर्ल्डवाईल्ड कलेक्शन
अजय देवगण, रितेश देशमुख, अमित सियाल आणि सौरभ शुक्ला यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सॅकनिल्कच्या मते, जर आपण चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर, सॅकनिल्कच्या मते, त्यानं 10 दिवसांत 148.20 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच, आज चित्रपट 160 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.