एक्स्प्लोर

पुरुषाला मिठी मारल्याने व्हायरल झालेल्या साध्वीचा संशयास्पद मृत्यू; 4 तासांनतर इन्स्टाग्राम पोस्ट, मृत्यूचं गूढ वाढलं

Sadhvi Prem Baisas Suspicious Death: जोधपूरमध्ये साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू. मृत्यूनंतर चार तासांनी इंस्टाग्रामवर न्याय मागणारी पोस्ट.

Sadhvi Prem Baisas Suspicious Death: राजस्थानमधील जोधपूर येथील प्रसिद्ध साध्वी प्रेम बैसा यांचं निधन झालं. त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झालाय. त्यांना त्यांच्या आश्रमातून उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.   डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आरती नगर येथील आश्रमात परत नेण्यात आले. दरम्यान, साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर झाली.  या पोस्टद्वारे त्यांनी न्याय मागितला आहे. प्रेम बैसा यांच्या मृत्यूच्या  4 तासांनंतर ही पोस्ट शेअर झाली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रैम बैसा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी एका पुरूषाला मिठी मारली होती. या व्हिडिओमुळे प्रेम बैसा सोशल मीडियात चर्चेत आली होती. दरम्यान, प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

साध्वी प्रेम बैसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होत्या. दरम्यान, त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर खळबळ उडाली. दरम्यान, प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर  एक पोस्ट शेअर झाली. या पोस्टमध्ये, 'न्याय मृत्यूनंतर मिळेल.. जिवंत असताना नाही' त्यांनी असं फोटोला कॅप्शन दिलंय.  या पोस्टमुळे या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले.  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  परंतु, कुटुंब त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय  चौकशीची मागणी करत आहेत. 

व्हायरल व्हिडिओमुळे साध्वी प्रेम बैसा चर्चेत

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sadhvi prem baisa (@sadhvi_prembaisa)

जुलै 2025 रोजी सोशल मीडियावर  एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती.  व्हिडिओमध्ये  साध्वी प्रेम बैसा एका पुरूषाला मिठी मारताना दिसली.  व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला ब्लँकेट घेऊन खोलीत प्रवेश करते.  नंतर एका पुरूषाला प्रेमाने मिठी मारते. हा व्हायरल व्हिडिओ तीन वर्षे  जुना असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ एडिटेड असल्याचंही बोललं जात होतं. व्हिडिओ व्हायरल होताच साध्वी प्रेम बैसा  यांनी  या व्हिडिओतील पुरूष आपले वडील असल्याचं सांगितलं.  या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार वादविवाद झाला.  काहींनी साध्वी प्रेम बैसा यांच्यावर अश्लील टीका केली.

साध्वी प्रेम बैसा यांचा मृत्यू नेमका कसा झाला?

28 जानेवारी 2026 रोजी साध्वी प्रेम बैसा यांना गंभीर अवस्थेत जोधपूर येथील रूग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  मृत्यूचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  त्यांच्या मृत्यूनंतर साध्वी प्रेम बैसा यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर झाली.  या पोस्टमध्ये त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. मृत्यूच्या अगदी चार तासांनंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.  व्हायरल व्हिडिओमुळे आलेला तणाव आणि नैराश्याशी मृ्त्यूचा संबंध जोडला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget