Russia-Ukraine War : रशियाच्या माध्यमांचे म्हणणे आहे की, नाटोच्या (Nato) विरोधात मॉस्कोचे तिसरे महायुद्ध आता सुरू झाले आहे. युक्रेनमध्ये रशियाने आणखी एक लष्करी गुप्तचर एजंट गमावल्याच्या घटनेनंतर हे खळबळजनक विधान एका प्रसिद्ध वृत्तनिवेदकाकडून आले आहे. ही क्रेमलिनची सर्वोच्च गुप्तचर सेवा आहे. ओल्गा स्काबायेवा यांनी वृत्तवाहिनीच्या दर्शकांना सांगितले की, पुढे जे वॉर सुरू आहे, त्याला तिसरे महायुद्ध म्हणता येईल. तसेच हे पूर्णपणे निश्चित आहे. तसेच वृत्तनिवेदकाने असेही सांगितले की, आता आम्ही निश्चितपणे नाटोधांविरुद्ध लढा देत आहोत.


कीव्ह सरकारनेही युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा


खरं तर, अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, रशियाचे क्षेपणास्त्र वाहक उत्तरीय काळ्या समुद्रात बुडाले हे युक्रेनच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र हल्ल्याचे लक्ष्य होते आणि एका क्षेपणास्त्र जहाजाला धडकले. कीव्ह सरकारनेही युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर गुप्तचर माहिती सामायिक करणार्‍या यूएस संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी किमान एक, संभाव्यतः दोन क्षेपणास्त्रे मॉस्क्वावर पडली होती, ज्यामुळे आग लागली.


आतापर्यंत 3000 युक्रेनियन सैनिक मारले गेले
त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे, याचा तपशील दिला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 3000 युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय 10 हजार जवान जखमी झाले आहेत.


95 टक्के नागरिकांचा मृत्यू गोळी लागल्याने


आज रशिया-युक्रेन युद्धाचा 52 वा दिवस आहे. या 52 दिवसांत रशियाने युक्रेनमधील अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामध्ये युक्रेनची राजधानी कीव्हचाही (Kiev) समावेश आहे. रशियन सैन्याने कीव्हमध्ये गोळीबार केला. आता रशियन सैन्य माघारी परतल्यानंतर कीव्हमध्ये 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. कीव्हमधील प्रादेशिक पोलीस दलाचे प्रमुख आंद्रे नेबिटोव्ह यांनी सांगितले की, सापडलेले काही मृतदेह तात्पुरते दफन करण्यात आले असून काही अद्यापही रस्त्यावर पडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 95 टक्के नागरिकांचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे दिसून येते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha