Sukhwinder Singh : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) यांनी ‘बजरंगबली’ भक्तांना एक खास भेट दिली आहे. सुखविंदर यांनी अशी अनमोल भेट दिली आहे, यापुढे सर्वांचेच मस्तक श्रद्धेने झुकेल. सुखविंदर सिंह यांनी आपल्या आवाजातील ‘श्री हनुमान चालिसा’ लाँच केली आहे. अयोध्येला जाऊन प्रभू श्री राम यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सुखविंदर सिंह यांनी टाइम ऑडिओ आणि राज व्हीएफएक्स निर्मित त्यांच्या संगीत व्हिडीओचे अनावरण केले.
आपल्या आवाजातील हनुमान चालिसा प्रेक्षकांच्या भेटीला आणताना खूप आनंद होत असल्याचे ते म्हणाले. सुखविंदर सिंह म्हणाले की, 'मी नेहमीच भगवान श्री हनुमानजींचा भक्त राहिलो आहे. या शक्तीमंत्राला माझा आवाज द्यावा अशी इच्छा होतीच, भगवान हनुमानजींच्या कृपेने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. टाईम ऑडिओने गाण्यासाठी आपल्या प्रकारचा पहिला लाईव्ह अॅक्शन+अॅनिमेशन आधारित म्युझिक व्हिडीओ तयार करून गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे आणि आता श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामजींचे आशीर्वाद प्राप्त करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. बजरंगबलीच्या प्रत्येक भक्ताने हे गाणे माझ्यासोबत गावे, अशी माझी इच्छा आहे.’
हा म्युझिक व्हिडीओ लाईव्ह अॅक्शन आणि अॅनिमेशनचा अनोखा मेळ आहे. या गाण्याचे VFX आणि त्याची रचना चिराग चंद्रकांत भुवा आणि शंभू जे सिंग यांनी केली आहे. त्याचबरोबर या गाण्याचे दिग्दर्शक राजीव खंडेवाल आहेत. कोरिओग्राफर लॉलीपॉप आहेत, डीओपी संतोष दामोदर देटके आहेत. टाईम ऑडिओद्वारे हे गाणे जगभरात प्रसिद्ध आणि वितरित केले जाणार आहे.
हेही वाचा :
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्सनंतर आता दिल्ली फाइल्स'; विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा
- Chandramukhi : 'चंद्रमुखी'ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका; 'बाई गं...' लावणीमध्ये अमृताच्या दिलखेच अदा
- Ti Aani Shala : शाळेतल्या 'ती'ची गोष्ट! अल्लड वयातल्या प्रेमावर आधारित नवी वेब सिरीज