रत्नागिरी : "शिवसेनेला (Shiv sena) संपवणे म्हणजे महाराष्ट्र ( Maharastra) संपवणे आहे. शिवसेनेचा धनुष्य बाण हिसकावून घेणारी औलाद अजून जन्माला आली नाही आणि येणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे सरचिटणीस खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलाय. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात निनायक राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी शिसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday samnt) यांच्यावर जोरदार टीका केली. 

Continues below advertisement


मेळाव्यात बोलत असताना विनायक राऊत यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असा केला. तर उदय सामंत यांचा उल्लेख उपरा असा केला. विनायक राऊत म्हणाले, रत्नागिरीसह महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. अनेक जण शिवसेनेचा बाण हिसकावून घेण्याची भाषा करत आहेत. परंतु, शिवसेनेचा धनुष्य बाण हिसकावून घेणारी औलाद अजून जन्माला आली नाही आणि येणार देखील नाही."


"उदय सामंत हे काल परवा आले आहेत. परंतु, आता सांगत आहेत की, मला शिवसेना वाचवायची आहे. आदित्य ठाकरे यांनी केवळ एका मंत्र्याला जवळ केले ते म्हणजे उदय सामंत आहेत. आदित्य यांनी भरवलेल्या फ्रँकीची आणि अन्नाची तरी किंमत ठेवायची होती, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.  


विनायक राऊत यांनी यावेळी भाजपवर देखील टीका केली. "उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात राज्यात प्रभावी काम केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे पाहिल्या पाच मुत्र्यमंत्र्यांपैकी पहिल्या नंबरचे मुख्यमंत्री ठरले. परंतु,  भाजपच्या लोकांना कोरोना काळात राज्यात दोन लाख लोक मरावीत असं वाटत होतं, असा आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला.  


 प्रत्येक बंडखोर आमदाराने 50 ते 60 खोके घेतले 


शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल. तुमच्या जाण्याची आम्हाला किंमत नाही. यापुढे कोणत्याही गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश नाही. प्रत्येक बंडखोर आमदाराने 50 ते 60 खोके घेतले आहेत, अशा आरोपत विनायक राऊत यांनी यावेळी केला.