Ratnagiri News : राज्याप्रमाणे आता स्थानिक पातळीवर देखील फोडाफोडी आणि कटशाहचे राजकारण होताना दिसून येत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटात राजकीय वर्चस्वासाठी लढाई सुरु झाली आहे. त्यामुळे एकमेकाच्या गटातील कार्यकर्ते, नेते यांना आपल्याकडे खेचण्याची एक स्पर्धाच दिसून येत आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. सत्तांतर झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कुणी शिंदेंसोबत गेले नाही. पण, असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी (Ratnagiri) येथील सभेत ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीतील (Lanja Nagar Panchayat) नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याकामी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किंग मेकर म्हणून ओळख असलेल्या किरण सामंत यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नगरसेवकांच्या साथीने शिंदे गटाने ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव (Motion of No Confidence) मांडला आहे. 10 एप्रिल रोजी मांडलेल्या या ठरावावर आज (17 एप्रिल) मतदान होणार आहे. त्यामुळे या अविश्वास ठरावाचा निकाल कुणाच्या बाजूने जाणार? शिंदे का ठाकरे गट बाजी मारणार? याची चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे. 


12 नगरसेवक अज्ञात स्थळी


दरम्यान, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमिवर शिंदेगटासह 12 नगरसेवक हे अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. अविश्वास ठरावादरम्यान होणारी संभाव्य पळवापळवी, फाटाफूट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. 


राजन साळवी, विनायक राऊत यांना धक्का? 


दरम्यान, अविश्वास ठरावाचा निकाल काय लागणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या या ठिकाणी राजन साळवी (Rajan Salvi) आमदार आहेत. शिवाय, विनायक राऊत (Vinayak Raut) खासदार आहेत. आमदार म्हणून राजन साळवी यांनी पकड मजबूत मानली जाते. दरम्यान, आजचा अविश्वास ठराव कुणाच्या बाजुनं लागणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मुख्यबाब म्हणजे अविश्वास ठराव ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास आमदार राजन साळवी यांना धक्का मानला जाऊ शकतो. शिवाय, आगामी काळात स्थानिक पातळीवरील गणितं देखील बदलू शकतात. याचे पडसाद नगरपंचायतीच्या राजकारणात दिसू शकतात. 


VIDEO : Lanja Nagar Panchayat : राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांना धक्का बसणार?



हेही वाचा


विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोकणात ठाकरे गट लागला कामाला, उदय सामंतांविरोधात उमेदवाराची चाचपणी सुरु