Ratnagiri News : गुजरातच्या (Gujarat) बोटीला रत्नागिरीजवळ (Ratnagiri) जलसमाधी मिळाली. यात दोन खलाशांचा (Sailor) मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. रत्नसागर असे बोटीचे नाव आहे. जयगडपासून 80 नॉटिकल माईल परिसरात ही घटना घडली आहे. भारतीय कोस्ट गार्डकडून (Indian Coast Guard) युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना काल (3 जानेवारी) संध्याकाळी घडली होती. 


बोटीवरील चार जणांना वाचवण्यात कोस्ट गार्डला यश


ही घटना काल (3 जानेवारी) संध्याकाळी घडली होती. जयगडपासून 80 नॉटिकल माईल क्षेत्राबाहेर ही घटना घडली. बोट बुडल्याची माहिती मिळताच कोस्ट गार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आलं. त्यामध्ये चार जणांना वाचवण्यात आलं आहे. कोस्ट गार्डने हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्य केलं. या बोटीवर नऊ जण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन खलाशांनी प्राण गमावले तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान बचावलेले चार जण आणि दोन खलाशांचे मृतदेह घेऊन कोस्ट गार्डचे जवान मिरकरवाडा बंदरात दाखल पोहोचले.


सप्टेंबर महिन्यात कोस्ट गार्डने बुडणाऱ्या जहाजातून 19 जणांना वाचवलं होतं!


मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरी किनारपट्टीजवळ बुडणाऱ्या बिटुमेन-वाहक जहाजातून 18 भारतीय आणि 1 इथिओपियन अशा 19 जणांना वाचवलं होतं. रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेकडे, सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी मोटार टँकर पार्थ, गॅबन ध्वजांकित जहाजाने बोटील पाणी शिरल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली. कोस्ट गार्डने बचाव कार्य सुरु करुन 19 जणांना वाचवलं. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन इथून न्यू मंगलोरला जात होतं.


रत्नागिरीमध्ये समुद्राच्या मध्यात बोटीला आग


तर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्ये समुद्राच्या मध्यातच एका मासे पकडणार्‍या बोटीला आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना 25 डिसेंबर रोजी दुपार घडली. आगीत बोटीचं नुकसान झालं होतं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.


हेही वाचा


भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी, रत्नागिरीतील समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून 19 जणांची सुखरूप सुटका