रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण शहरातील मगरींच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर आढळल्यानं खळबळ उडाली होती. मगरी नागरी वस्ती दिसत असल्यानं नागरिकांंमध्ये भीतीचं वातावरण बनल आहे. चिपळूणमधील मगरीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवारी रात्री महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्यान प्रत्यक्षदर्शी मात्र घाबरुन गेले होते. प्रशासनानं मगरी नदीपात्र सोडून शहरात पोहोचणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी देखील होतं आहे.


शिव नदीच्या पात्रात मगरींचा वावर


चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा वावर प्रचंड आहे. चिपळूण मधील चिंचनाका परिसरात महाकाय मगर रस्त्यावर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. शहरातून वाहणारी शिव नदी च्या पत्रात मगरींचा वावर प्रचंड आहे.  पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरता दिसून येत असतात. 


रविवारी रात्री अशीच एक भली मोठी मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची देखील चांगलीच बोबडी वळली. प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा रस्त्यावरील व्हिडीओ फोनमध्ये चित्रित केला. त्यानंतर सोशळ मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मगरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत असून मानवी वस्तीमध्ये मगरींचा मुक्त वावर हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे.




चिपळणमध्ये रस्त्यावर, नागरिकांकडून चित्रण


शहरात यापूर्वी गोवळकोट भागात मगर आढळून आली होती. आता चिंचनाका भागात मगर आढळून आली आहे. चिंचनाका भागातील मगर मुख्य रस्त्यावर पोहोचली होती. एक रिक्षाचालक आणि कारमधील काही जणांनी मगरीचा व्हिडीओ चित्रित केला. यानंतर या मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.


चिपळूणमध्ये मगरींचा वावर


चिपळूणमधून वाहणाऱ्या वशिष्ठी आणि शिव नदीपात्रातून अनेकदा मगरी शहरात येत असतात. यापूर्वी देखील मगरी शहरी भागात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मानवी वस्तीत मगर आढळून आल्यान खळबळ उडाली. काही प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा व्हिडीओ फोनमध्ये कैद केले.  


इतर बातम्या : 


Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....


Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?