Ratnagiri: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांग्लादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा असून रत्नागिरीत मुंबई पोलिसांना एका तपासादरम्यान बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला शिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्म दाखला देण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. मुंबईतील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने एका बांगलादेशी नागरिकाला स्थानिक भूमिपुत्र असल्याचा दाखला दिला होता. हे प्रकरण समजताच मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात येत असून, जन्म दाखला कसा आणि कोणत्या आधारावर दिला गेला, याचा तपशील घेतला जात आहे. विशेष म्हणजे, त्या काळातील ग्रामसेवक यांना आता पदोन्नती मिळाली असून ते जिल्ह्यात विस्तार अधिकारी म्हणून काम करत आहेत.


शिरगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांची मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर चौकशी केल्याची माहिती आहे. शिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील याबाबतचे अहवाल सादर करा असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईतील एका गुन्ह्यामध्ये तपास करत असताना आरोपी असलेल्या बांगलादेशी नागरिकाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतने जन्म दाखला दिल्याची बाब समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबतची कारवाई करत जन्म दाखला देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि  अधिकारी यांची चौकशी केली. मोहम्मद इद्रिक इसाक शेख असा जन्मदाखला दिलेल्या बांगलादेशी व्यक्तीचे नाव आहे. तत्कालीन ग्रामसेवक यांची पदोन्नती झाली असून ते सध्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी विस्तार अधिकारी म्हणून काम करतात.


ग्रामपंचायतीनंच केलं कोकणचा भूमीपूत्र!


रत्नागिरीच्या शांत आणि निसर्गरम्य कोकण किनाऱ्यावर शिरगाव गावात वेगळ्याच प्रकरणामुळं चर्चेत आले आहे. मुंबईतील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती लागली. आरोपी असलेल्या बांगलादेशी नागरिकाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने दिलेला जन्मदाखला सापडला! "मोहम्मद इद्रिक इसाक शेख" असे नाव असलेला हा जन्मदाखला पाहून पोलिसांनी लगेच शिरगावकडे मोर्चा वळवला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.


या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीतील कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीच्या भूमीचा बांगलादेशी नागरिकाला 'स्थलिक' बनवणाऱ्या या प्रकाराने प्रशासनाची विश्वासार्हता आणि ग्रामपंचायतीतील प्रक्रियेवर मोठे संशय निर्माण केले आहेत. आता यावर कठोर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा:


नेरूळच्या महिलेनं भाजी विकून पै अन् पै जोडली, पोटाला चिमटा काढून टोरेसमध्ये गुंतवली; भाबडी आशा ठेवली अन् फसवणूक झाली!