रत्नागिरी : मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना हेतुपुरस्कार राजीनामा देण्यासाठी काही लोकांचे हे कटकारस्थान असल्याचं म्हणत नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उभारलेल्या आंदोलनावर देखील रामदास कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


रामदास कदम यांनी यावेळी विरोधकांवर देखील सवाल उपस्थित केला असल्याचं म्हटलं जात आहे. कारण यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, 'एकाच वेळेला धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाज रस्त्यावर कसा येतो याचा अर्थ आम्हाला कळत नाही असं नाही.' 


त्यांचा मी धिक्कार करतो - रामदास कदम


'काही लोकांचा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी हेतुपुरस्कार हे कटकारस्थान सुरु असून त्याचा मी धिक्कार करतो', असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे.


'आंदोलनाचा दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा'


'अंतरवली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनाचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या आंदोलनामध्ये पोलीस देखील जखमी झाले. त्यांचं काम हे जरांगे यांना वाचवणं होतं, आंदोलन चिघळवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पोलीस आंदोलन सोडवण्यासाठी गेले त्यांना विरोध झाला म्हणून त्यांनी लाठीचार्ज केला.  मी पोलिसांचा समर्थन करत नाही, पण या गोष्टींचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा', असं रामदास कदम म्हणाले. 


मला कुणबी प्रमाणपत्र नको - रामदास कदम


'मी देखील मराठा आहे. मलाही वाटतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी देखील इच्छा आहे, पण मी कुणबी प्रमाणपत्र स्विकारण नाही असं थेट रामदास कदम यांनी म्हटलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यावर बोलताना त्यांना म्हटलं की, जरांगेंनी ठेका घेतला आहे का सगळ्यांचा', मला नको कुणबी प्रमाणपत्र. 


जरांगे यांनी स्पष्टपणे सांगायला हवं होतं की, 'ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कोणतेही मतभेद होता कामा नये. ओबीसींचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण द्या. सरकार म्हणतं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. जे लोकं आर्थिकदृष्ट्या खंबीर नाही, त्यांना आरक्षण देण्याची काम सरकार करत आहे, असं देखील रामदास कदमांनी म्हटलं आहे.' 


'एकाच वेळी सगळे कसे रस्त्यावर उतरतात?'


'एकाच वेळी धनगर समाज, ओबीसी समाज आणि मराठा समाज रस्त्यावर कसा उतरतो याचा अर्थ आम्हालाही कळतो. आम्ही देखील गेली 55 वर्ष राजकारण करत आहोत. त्यामुळे मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी समजू नये इतरांना काही दिसत नाही', असं म्हणत रामदास कदम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. 



हेही वाचा : 


Nitin Gadkari : मनसे म्हणाली, मुंबई-गोवा महामार्गाला गडकरींचे नाव द्या; आता गडकरी म्हणाले, जबाबदारी माझीच! राज्य सरकारवरही फोडले खापर