रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa National Highway) चिपळूण नजीकच्या बहादुर शेख नाक्याजवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच गर्डर कोसळला त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गर्डर कोसळल्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी घटनस्थळाचा आढावा घेतला.
बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पडलेल्या उड्डाण पुलाची गांभीर्याने दखल घेतली. गर्डर कोसळल्याती माहिती मिळता मुंबईवरून येताच रवींद्र चव्हाण यांनी बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाची पाहणी केली. तसेच बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पडलेल्या उड्डाण पुलाची गांभीर्याने दखल घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारीही बांधकाम मंत्र्यांसोबत उपस्थित होते. काल सकाळी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाच्या गर्डरला तडा गेला होता या संदर्भात एबीपी माझाने बातमी देखील दाखवली होती. त्यानंतर तडा गेलेल्या उड्डाण पुलाच्या भाग दुपारनंतर होता कोसळला. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून उड्डाण पुलाच्या सुरक्षेसाठी सूचना देण्यात आल्या आहेतय
बहादुर शेख नाक्याजवळ मुंबई- गोवा महामार्ग आणि चिपळूण कराड मार्ग असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी चौपदरीकरणात एकूण 45 पिलर चा मोठा ब्रिज आहे. सध्या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या पीलरवर बसवलेल्या गर्डरला मध्येच तडे गेल्याने कामाचा दर्जा पुन्हा एकदा पुढे आला आहे. गणपती नंतर येथे या पीलरवर गर्डर उभारला गेला होता. अवघ्या दोन आठवड्यातच त्याला तडे गेले आणि तो कोसळला.
कोकणातल्या रखडलेल्या रस्त्याबाबत सरकार गंभीर नाही
पुलाचा गर्डर कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, रविंद्र चव्हाणांनी कितीतरी वेळा महामार्गाचा पाहणी दौरा केला. मात्र एकदाही या पुलाची टेस्टिंग झाली नाही. यांचा प्रशासनावर होल्डच नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील 12 पुलांच भूमीपूजन केले त्यातला एकही पूल पूर्णत्वास गेला नाही. कोकणातल्या रखडलेल्या रस्त्याबाबत ना केंद्र सरकार गंभीर ना राज्यसरकार गंभीर आहे. कोसळलेल्या पुलाच्या घटनेची जबाबदारी दोन्ही सरकारला घ्यावी लागेल. नितीन गडकरींनी एकदातरी पनवेल ते चिपळूण बायरोड प्रवास करावा.
पाहणी, दौरे,आश्वासने मात्र महामार्गाचं काम मात्र जैसे थे
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. . दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही...