रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) तालुक्यामध्ये गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणूकीत दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरला. दरम्यान या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.  राज्यात सध्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. पण रत्नागिरीमध्ये या गणेश विसर्जन मिरवणूकीला गालबोल लागलंय. दरम्यान गणेशोत्सवाच्या निमित्ताने अगदी वाजत गाजत सगळीकडे मिरवणुका काढण्यात येत आहे. भक्तीभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. तर प्रशासनाकडूनही याच दृष्टीकोनातून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांचा उत्साह राज्यभरात आहे. 


नेमकं काय घडलं?


कोकणात गणेशोत्सवाचा उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. पण बरेच गणपती हे पाच किंवा सात दिवसांचे असतात. पण यंदाच्या वर्षात अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील अनेक गणपती विसर्जन होत आहेत. अनंत चतुदर्शीच्या दिवशी विसर्जनाची मिरवणूक निघाली होती. याच मिरवणूकीमध्ये हा टेम्पो शिरला. या टेम्पोचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले असल्याची माहिती  देण्यात आलीये. 


राज्यात गणपती विसर्जनाची धामधूम


संपूर्ण राज्यात सध्या दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभर मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळतोय. असाच काहीसा उत्साह कोकणात पाहायला मिळतोय. पण याच मिरवणुकीला गालबोट लागल्याचं यावेळी पाहायला मिळतयं. यामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासनाकडून चालकाची देखील चौकशी करण्यात येत आहे. तर आता याप्रकणी आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मुंबईतही विसर्जनाला गालबोट


मुंबईतील जुहू चौपाटीवर देखील दुर्घटना घडली. यामुळे मुंबईतील विसर्जन मिरवणूकीला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. मुंबईत दुपारपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस कोसळत होता. यावेळी एका 16 वर्षीय स्वयसेवकचा मृत्यू झाला. हसन शेख असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


हेही वाचा : 


Mumbai Ganesh Visarjan : जुहू बीचवर वीज कोसळली, विसर्जनासाठी असलेल्या स्वयंसेवकाचा जागेवरच मृत्यू