Ratnagiri Latest Marathi News : आकाशगंगा, अंतराळाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. त्यावर काही जण अभ्यास, संशोधन देखील करतात आणि माहिती देखील घेत असतात. काहींमध्ये क्षमता असते पण, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे देखील विद्यार्थी मागे पडतात. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 36 विद्यार्थ्यांना आता आपल्या देशाची अंतराळ संशोधन करणारी संस्त्रा इस्त्रो आणि अमेरिकेची नासा या ठिकाणी भेट देऊन तिथल्या कार्याची माहिती घेता येणार आहे. त्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी परिक्षेच्या आधारे केली जाणार आहे. मुख्यबाब म्हणजे जिल्हा नियोजनमधून 65 लाख रूपयांच्या निधी वितरणाला शिक्षण संचालकांनी मंजुरी देखील दिली आहे. मिशन गगन भरारी या उपक्रमातंर्गत प्राथमिक शाळेतील हे विद्यार्थी आता नासा आणि इस्त्रोला भेटी देऊ शकणार आहेत.


हुशार असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक वृत्तीला वाव देणे, त्या दृष्टीनं ही पावलं उचलली जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी याबाबतचा आराखडा तयार केला. उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील याला पाठबळ दिले. त्यांना नासासाठी 55 लाख तर इस्त्रोमधील भेटीसाठी 15 लाख रूपयांची तरतूद करून दिली आहे. मिशर गगन भरारी उपक्रमातंर्गत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया हे डिसेंबरमध्ये राबवली जाणार आहे. यामध्ये केंद्र आणि बीट स्तरावर 100 गुणांची विज्ञान या विषयावर आधारित परिक्षा घेतली जाईल. केंद्र आणि बिट स्तरावर प्रत्येकी 10 , पुढे तालुका स्तरावर  विद्यार्थ्यांनी निवड केली जाईल. त्यानंतर जिल्हा स्तरावर अंतिम निवड केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील या प्रमाणे 27 विद्यार्थी 9 तालुक्यातून निवडले जाणार असून इस्त्रोसाठी 9 जणांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सातवीमध्ये पहिला नंबर मिळवणाऱ्या 9 विद्यार्थ्यांचा समावेश असेल.


नासा, इस्त्रोमध्ये विद्यार्थ्यांना काय काय पाहता येणार? 
या उपक्रमातंर्गत 2 मार्च रोजी नासा स्पेस सेंटरमध्ये होणाऱ्या मार्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, जोन्सन स्पेस सेंटर, सायन्स म्युझिअम कॉलॅब्रेटीव्ह इंटरनॅशनल स्पेस सेंटर पाहता येणार आहे. तर, कॅनडी स्पेट सेंटरमध्ये शटल प्रक्षेपणासह लिफ्ट ऑफ अनुभवता येणार आहे. शिवाय, तसेच नासामध्ये असलेल्या चंद्रावरील तुकड्याला स्पर्श करण्याची देखील संधी मिळणार आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI