Ratnagiri : गुहागरमधील (Guhagar)  गोपाळगड किल्ल्यावरच्या (Gopalgad Fort) अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा टाकला आहे.  पुरातत्व विभागाने पोलीस संरक्षणामध्ये व महसूलच्या उपस्थितीत तोडकामाची कारवाई केली आहे. 17 मार्च 2025 रोजी किल्ल्याच्या  क्षेत्रातील गट क्रमांक 82 व 83 मधील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

Continues below advertisement


कोर्टाच्या नोटीसवर दोन एप्रिल 2025 पर्यंत म्हणणे मांडण्याचीही मुदत देण्यात आली होती. मात्र कोणतेच म्हणणे न मांडल्याने  अखेर गोपाळगडावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला आहे. राज्य संरक्षित असलेल्या गोपाळगडाचा अनधिकृत बांधकामापासून श्वास मोकळा झाल्यामुळे आता आतील जमीन सरकार कशा पद्धतीने आपल्या ताब्यात घेते याकडे लक्ष लागले आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune News: पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रंगली पार्टी? काँग्रेस नेत्याने शेअर केले व्हिडिओ, महसूल मंत्र्यांनाही धरलं धारेवर