Ramdas Kadam and Vaibhav Khedekar: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी गटाकडून विरोधी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गळाला लावण्याची मोहीम सुरु झाले. शुक्रवारी रत्नागिरी येथील चिंचघरमध्ये मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मनसेच्या वैभव खेडेकर यांना पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत (Uday Samant), मंत्री योगेश कदम ,माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीही रंगली होती. (Maharashtra Politics News)

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय कदम यांनी या कार्यक्रमात रामदास कदम यांच्याशी असलेले वैर संपुष्टात आल्याचे सांगितले. माझ्यातले आणि योगेश कदम यांच्यातले राजकीय मतभेद मी भैरीच्या पायाखाली गाडून टाकले आहेत. आमच्यातला संघर्ष संपल्यामुळे योगेश कदम यांना आता लॉलीपॉप मिळाला आहे, असे संजय कदम यांनी म्हटले. कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांच्याकडून राजकीय टोलेबाजी करण्यात आली. या कार्यक्रमात मनसेचे नेते वैभव खेडेकर हेदेखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून उदय सामंत यांनी म्हटले की, आज जे व्यासपीठ तयार झालंय ते असेच राहावं. संजय कदम यांनी रामदास कदम यांचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे माझी अडचण दूर झाली आहे. संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्षात हळूच माझं नाव यायचं. त्यामुळे रामदास भाईंच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज व्हायचा, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

Ramdas Kadam Shinde Camp Shivsena: रामदास कदमांची वैभव खेडेकरांना शिंदे गटात येण्याची जाहीर ऑफर

2009 मधल्या माझ्या पराभवामुळे संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा पहायला मिळाली. दापोली सोडून दुसरीकडे प्रयत्न केले तर संजय कदम आमदार व्हाल. फक्त दापोलीचा विचार करू नका, असा टोला रामदास कदम यांनी संजय कदम यांना लगावला. माझी दोन दोन मुलं आमदार झाली तर मला आनंदच होईल. वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो. वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे.  आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी है, असे सांगत रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांना शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली.

आणखी वाचा

आपण यांची लावली आणि सत्तेवर आलो, आता हे आमची लावायला आलेत, व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचं भाष्य, फडणवीसांची मिमिक्री