रत्नागिरी : महाराष्ट्रातील राजकारणात काका-पुतण्याचा संघर्ष सर्वांना परिचित आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे अनेक संघर्ष महाराष्ट्राने पाहिले आहेत. आता कोकणात देखील राजकारणातील काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनीदेखील त्यांच्याविरोधात दंड थोपटला आहे. 


रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्धार केला आहे. आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे मात्र त्यांच्या या निर्धारामुळे काका पुतण्यांमधील संघर्ष कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पाहायला मिळणार आहे.


तीन वर्षे खूप सहन केलं


मागील तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट म्हणून जे प्रकरण गाजलं ते सर्व कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप वेळ सहन केलं आहे. जिल्हाध्यक्ष संजयकाका कदम यांना कसंही करून निवडून आणायचा निर्णय आता आम्ही घेतलाय. मागील तीन वर्षात त्यांनी आम्हाला मानसिक खूप सपोर्ट केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले. आता आमचं कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचं. यापूर्वी देखील ते राष्ट्रवादीतून आमदार होते, आता ते शिवसेनेत आहेत. 


रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देताना अनिकेत कदम म्हणाले की, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार.


माझी राजकारणात सुरूवात 


अनिकेत कदम म्हणाले की,मी एक व्यावसायिक माणूस आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झालं आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही विचार करू. 


ही बातमी वाचा :